Tue, Jul 07, 2020 23:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात सरासरी ५६.५७ टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक चुरस

राज्यात सरासरी ५६.५७ टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक चुरस

Published On: Apr 23 2019 8:48PM | Last Updated: Apr 23 2019 8:50PM
नवी मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अत्यंत चुरशीने आणि इर्ष्येने राज्यातील सर्वांधिक हायव्होल्टेज असणाऱ्या १४ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. ईव्हीएममध्ये गडबडी,  मतदारयादीत नाव गायब आदी कारणांचा अपवाद वगळल्यास राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत झाले. अत्यंत लक्षवेधी झालेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांधिक ६५ टक्के मतदान झाले, तर पुण्यात पुर्णतः निरुत्साह दिसून आला. पुण्यात पाचपर्यंत ४२ टक्के मतदानाची नोंद झाली. 

राज्यातील चौदा लोकसभा मतदार संघांमध्ये मंगळवारी मतदान पार पडले. कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा, बारामती, दक्षिण नगर, पुणे, माढा, रावेर, जळगाव, औरंगाबाद, जालना, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या चौदा ठिकाणी मतदान झाले. 

या चौदा लढतींपैकी आठ लढती या शरद पवारांचे बलस्थान मानल्या जाणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांच्यावर तुफानी प्रहार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा प्रमुख धागा हा प्रामुख्याने पवारविरोधीच राहिला.

या ठिकाणी होत असलेल्या निवडणूक निकालावरच राज्याच्या भावी राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान प्रामुख्याने याच मतदार संघांवर सर्वपक्षीय नेत्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. या मतदार संघातील निवडणुकांच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या प्रमुख अनुयायांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यात 5 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वांधिक 65 टक्के मतदान 

कोल्हापूर - 65%

सांगली - 60%

सातारा - 52%

हातकणंगले - 63%

पुणे - 42%

बारामती - 52%

अहमदनगर - 54%

माढा - 55%

जळगाव - 52%

रावेर - 54%

जालना - 61%

औरंगाबाद - 56%

रायगड - 53%

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 56%

सरासरी - 55 %

संबंधित बातम्या 

वाचा : राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापुरात

वाचा : सांगली : विट्यात ऑक्सिजनकिटसह वृद्ध महिलेने केले मतदान(video)

वाचा : 'ईव्हीएम'मध्ये दोष काढणे पडले महागात 

वाचा : ''ईव्हीएम'मध्ये फेरफार केले जाण्याची भीती'