Thu, Apr 25, 2019 03:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्हिएतनामच्या मैत्रिणीसाठी स्विस तरुणाची भारतात चोरी

व्हिएतनामच्या मैत्रिणीसाठी स्विस तरुणाची भारतात चोरी

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 1:35AMठाणे : वार्ताहर 

व्हिएतनाम येथील प्रेयसीला महागड्या वस्तू भेट देण्यासाठी ठाणे आणि हैद्राबाद येथे वास्तव्य करणार्‍या जवळच्या नातेवाईकांच्या घरातील दागिने चोरून त्याची विक्री कोलकत्ता ज्वेलरी मार्केटमध्ये करणार्‍या स्वित्झर्लंड निवासी आरोपी अभिषेक मिन्त्री याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल कारण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी नासीर कुलकर्णी यांनी दिली. 

वंशाने भारतीय व  स्वित्झर्लंड निवासी असलेला आरोपी अभिषेक मिन्त्री (41)  रा. इंटरलंकन  स्वित्झर्लंड याने व्हिएतनाम येथील प्रेयसीला महागडे गिफ्ट देण्यासाठी ठाणे कावेसर येथील आपल्या काकांच्या घरीच चोरी केल्याचे उघडकीस आले. ठाण्यातील काकांच्या घरातील लोक हे बाहेर जास्त असतात याचाच फायदा आरोपी अभिषेक घेत होता. 30 मार्च 2018 रोजी ठाण्यातील काकाच्या घरी आल्यानंतर घरी काकाचा मुलगा होता. काका आणि मावशी हे जयपूरला गेले होते. दुसर्‍या दिवशी अभिषेक हा घाईने आला आणि कोलकत्ताला जातो म्हणून निघाला.

आरोपी अभिषेक याचे कुटुंब  स्वित्झर्लंड येथे मनगटी घड्याळे तयार करण्याच्या व्यवसायात होते.   2013 आणि 2014 मध्ये अभिषेकला दुबईत पोलिसांनी अटक केली होती. त्याचवेळी त्यांच्या काकांनी त्याला सोडविले होते अशी माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी कुलकर्णी यांनी दिली.