Wed, Mar 27, 2019 06:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आवास योजनेत घराची बतावणी करून चोरी

आवास योजनेत घराची बतावणी करून चोरी

Published On: Jun 21 2018 1:35AM | Last Updated: Jun 21 2018 12:38AMठाणे : प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळाले असल्याची बतावणी करत संबंधित नागरिकांना घरापासून दूर बोलावत घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरी करणार्‍या चोरट्यास कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हीच पद्धत वापरून या चोरट्याने ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात तब्बल 37 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून  47 लाख 20 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.

तुकाराम लाला अडसूळ (41, रा.- साई श्रद्धा चाळ, रूम नंबर 2212/14, अर्जुनवाडी, घणसोली गाव, नवी मुंबई) असे चोरट्याचे नाव आहे. तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सरकारी कोट्यातून घर लागले असून घर हवे असेल तर कागदपत्रे घेऊन अमुक ठिकाणी या, अशी बतावणी हा चोरटा करायचा. ज्या व्यक्तीला फोन केला त्या व्यक्तीच्या घरी जाऊन घरातील इतर सदस्यांना देखील अशीच घर लागल्याची बतावणी करायचा. नंतर घरातील सदस्यांना दस्तावेज झेरॉक्स करण्यास बाहेर पाठवून घरातील दागिन्यांवर डल्ला मारयचा. ही पद्धत त्याने सर्वत्र अवलंबली.