Tue, Mar 19, 2019 09:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्री विष्णू सावरांच्या मुलीचा पराभव, सेनेच्या कोलेकर विजयी

मंत्री विष्णू सावरांच्या मुलीचा पराभव, सेनेच्या कोलेकर विजयी

Published On: Dec 18 2017 12:00PM | Last Updated: Dec 18 2017 12:23PM

बुकमार्क करा

वाडा: मच्छीन्द्र आगीवले

ठाण्यातील वाडा नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. भाजपच्या निशा सावरा यांचा त्यांनी पराभव केला. निशा सावरा या आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कन्या आहेत.

१७ जागांच्या वाडा नगरपंचायतीत शिवसेना, भाजपला प्रत्येकी ६ तर काँग्रेसला २, बहुजन विकास आघाडीला २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. अपक्ष उमेदवारांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे निकालावरून दिसत आहे.

सेना आणि भाजपला प्रत्येकी ६ जागा मिळाल्यामुळे बहुमताचा आकडा कोणालाच गाठता आलेला नाही. सत्ता मिळवण्यासाठी आता या दोन्ही पक्षांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.