Tue, Jul 16, 2019 09:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एस. टी च्या अपघातात १२ जण किरकोळ जखमी

एस. टी च्या अपघातात १२ जण किरकोळ जखमी

Published On: Jun 21 2018 4:12PM | Last Updated: Jun 21 2018 4:12PMठाणे : प्रतिनिधी 

ठाणे स्टेशन जवळील सॅटिस पुलावर गूरूवारी दुपारी दोन बसच्या झालेल्या धडकेत 12 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.  बसचा ब्रेक न लागल्याने ठाणे शहापूर बसला ठाणे भिवंडी  या बसचालकाने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. 

ठाणे सॅटिस पुलावरून जाणार्‍या जांभळी नाक्याच्या दिशेने उतारावरून ठाणे - शहापूर बस जात असताना मागून येणार्‍या ठाणे - भिवंडी या बसच्या चालकाने वेग नियंत्रित करण्यासाठी ब्रेक दाबला, परंतू ब्रेक न लागल्याने ही बस पुढच्या बसवर आदळली. ठाणे - भिवंडी या बसमधील 12 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती एस. टी. चे ठाणे विभागाचे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली. जखमींवर ठाणे जिल्हा रूग्णालयात उपचार करून नंतर त्यांना घरी सोडण्यात आले.