Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › त्यांच्या अपप्रचाराने सरकार बदनाम होत नाही : तावडे

त्यांच्या अपप्रचाराने सरकार बदनाम होत नाही : तावडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

राज्यातल्या 1300 शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा शरद पवार आणि सुप्रिया सुळे अपप्रचार करत आहेत. ज्या दुर्गम भागातील शाळांमध्ये दोनच मुले शिक्षण घेत आहेत, अशा शाळांमधील मुले त्या शाळेपासून जवळ अंतरावर असणार्‍या जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत वर्ग करण्यात आली आहेत, तर शाळा बंद केल्याचा अपप्रचार पवार पिता आणि लेक करत आहेत, त्यांच्या अपप्रचारामुळे सरकार बदनाम होत नाही किंवा विनोद तावडेही बदनाम होत नाही, मात्र दुर्गम भागातल्या, दऱ्या खोर्‍यातल्या बहुजन मुलांनी शिकू नये की काय, यासाठी ते असा अपप्रचार करत असल्याची शंका शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. 

ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी  वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने  महाराष्ट्रातल्या शतक पुर्ण करणार्‍या ग्रंथसंग्रहालयांच्या संमेलनाचे उद्घघाटन रविवारी  तावडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.  महाराष्ट्राच्या 2 लाख 40 हजार कोटींच्या अर्थसंकल्पातील 57 हजार  कोटी शिक्षण आणि त्यासंबंधीच्या बाबींवर खर्च होत असतात, त्यामुळे ग्रंथालयांनी  सरकारकडून अजून अपेक्षा करणं स्वाभविक असलं तरी राज्याच्या सध्याच्या आर्थिक घडीमध्ये ते अवघड आहे, याकडे तावडे यांनी लक्ष वेधले.  

सीबीएसई बोर्डाच्या पेपरफुटीमागे ज्यांनी शिक्षणाचे बाजारीकरण केले ते आहेत, असे ते म्हणाले. एसएससी बोर्डाचा पेपर फुटला नाही तर विद्यार्थी वर्गात गेल्यानंतर त्याने कॉपी करण्याचा प्रयत्न केला, तो कॉपीचा प्रकार उघडकीस आला, कॉपी करून परीक्षा उत्तीर्ण होता येईल, पण जीवनाची परीक्षा त्यामुळे उत्तीर्ण होता येणार नाही, हे पालक आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे, समाजमाध्यमाद्वारे पेपर फुटू नये यासाठी कडक उपाययोजना शासनाने केल्या आहेत, असे ते म्हणाले. राज्यातील शिक्षक भरतीत होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी शासनाने शिक्षकांची परीक्षा घेवून भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ग्रंथालयांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येत्या मे महिन्यात ग्रंथालयांच्या पदाधिकार्‍यांच्या, संघटनांची बैठक घेण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. 

Tags : thane, sharad pawar, supriya sule, disinformation, government, school policy,vinod tawde


  •