Sat, Feb 16, 2019 21:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या    

ठाण्यात शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या    

Published On: Feb 22 2018 6:16PM | Last Updated: Feb 22 2018 6:16PMठाणे : प्रतिनिधी

ठाण्यातील बेडेकर शाळेत दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या रचना शिंदे (वय15) या विद्यार्थिनीने गुरूवारी दुपारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ती ठाण्यातील बालकुंम भागात राहत होती. तीच्या आत्‍महत्‍येचे कारण समजू शकले नाही.

रचना हिने आत्महत्या का केली असेल याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून, याबाबत अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. पोलिसांनी रचना हीचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यास शवविच्छेदनासाठी ठाणे सीव्हील रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. दरम्यान, मयत रचना हिने आपल्या शाळेत मरनानंतर नेत्रदान करण्याचा संकल्प घेतला होता. त्यानुसार रचना हिचे नेत्रदान करण्यात येणार असल्याची माहिती रचनाचे वडील सूर्यकांत शिंदे यांनी सांगितले.