Tue, Jul 16, 2019 10:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्हा परिषद शाळांना सुट्टी जाहीर 

ठाणे जिल्हा परिषद शाळांना सुट्टी जाहीर 

Published On: Jul 10 2018 10:01AM | Last Updated: Jul 10 2018 5:17PMठाणे : प्रतिनिधी 

ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना मंगळवार १० जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी कळवले आहे.

सुट्टीचा संदेश विद्यार्थ्यांना तात्काळ पोहचविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व स्थानिक ग्रामस्थ, पालक यांच्याशी लगेचच संपर्क करावा. सर्व शिक्षक वेळेत शाळेत जातील व शाळेत कुणी विद्यार्थी आलेले नाहीत वा विद्यार्थी आले तर त्यांना सुखरूप घरी पोहचवून तशी खात्री करतील याची दक्षता घ्यावी. आजचा शालेय कामकाजाचा दिवस पुढील काळात भरण्यात येईल याची नोंद घ्यावी. सर्वांनी आज केलेल्या कार्यवाहीचा अहवाल केंद्रप्रमुख यांच्याकडे सादर करावा.

केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांचा आढावा घेऊन अहवाल देण्याच्या सूचना देण्यता आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. केंद्रप्रमुख, शिक्षक यांनी मुख्यालय सोडू नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.