Thu, Aug 22, 2019 04:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात प्लास्टिक मुक्तीला मॅरेथॉन स्पर्धेतच हरताळ(Video)

ठाण्यात प्लास्टिक मुक्तीला मॅरेथॉन स्पर्धेतच हरताळ(Video)

Published On: Sep 02 2018 11:06AM | Last Updated: Sep 02 2018 11:06AMठाणे : प्रतिनिधी 

'मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची' हे घोषवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्येच या उद्दिष्टाला हरताळ फासण्यात आले आहे . स्पर्धकांना देण्यात आलेले  फूड हे प्लास्टिकच्या पिशवीमधून देण्यात आले असून स्पर्धेच्या ठिकाणीच  प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला दिसून आला. पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल देखील मोठ्या प्रमाणात वाटण्यात आल्या आहेत. या बॉटल देखील रस्त्यावर टाकण्यात आल्या होत्या. हा प्रकार उघड झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी मात्र बचावाची भूमिका घेत याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे . 

यंदाची २९ वी ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन हि प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी आयोजित कारणात आली होती . मात्र ठाणे महापालिकेकडूनच या संदेशाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्लास्टिक बंदीसाठी सर्वच स्तरावर जाणजजागृती करण्यात येत असताना आलेल्या स्पर्धकांच्या माध्यमातून हा संदेश हजारो ठाणेकरांपर्यंत पोहचावा यासाठी यंदाच्या मॅरेथॉनचे हे घोषवाक्य ठेवण्यात आले होते. मात्र आता स्पर्धेतच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून नाष्‍टा देण्यात आला. 

यासंदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांनी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . प्लास्टिक मुक्तीसाठीच ठाणे महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत असल्याने मॅरेथॉन देखील प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला आहे . प्लास्टिकचा वापर होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने पूर्ण दक्षता घेण्यात आली होती मात्र फूडच्या बॉक्समध्ये प्लास्टिक असेल असा अंदाज कोणालाच नव्हता . याची चौकशी करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे . सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील बचावाची भूमिका घेतली आहे . स्पर्धेत हजारो स्पर्धक सहभागी झाले होते . त्यांना फूड आणि पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे . प्लास्टिक बंदी हाच महापालकेचा उद्देश असून रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या त्वरित उचलण्यात येणार आहेत . प्लास्टिकचा वापर हाऊ नये याची पूर्ण दक्षता ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आली होती मात्र हा भारत देश असून पूर्णपणे बंदी येण्यासाठी अधिक जनजागृती करावी लागेल असे म्हस्के यांनी सांगितले . 

पालिका आयुक्तांची अनुपस्थिती

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये यावर्षी विरोधकांनी काही प्रमाणात हजेरी लावली असली तरी मॅरेथानमध्ये खड्ड्यांचा अडथळा येऊ नये यासाठी गेले चार रात्री जाऊन खड्डे बुजवणारे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे मात्र अनुपस्थित राहिले. आयुक्त अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. महापौर आणि आयुक्तांमध्ये काही प्रमाणात तात्विक मतभेद असल्याने या स्पर्धेला आयुक्त हजार राहिले नाहीत अशी कुजबुज स्पर्धेच्या ठिकाणी सुरु होती . लोकप्रतिनिधींच्या वतीने मात्र ही चर्चा निष्फळ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे . 

अवयवदानासाठी धावले ३५० स्पर्धक

प्लास्टिक मुक्तीबरोबरच अवयव दानाचे महत्व नागरिकांमध्ये पटवून देण्यासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अवयवदान करण्यासाठी ज्यांनी यापूर्वीच फॉर्म भरले आहेत असे ३५० स्पर्धक सहभागी झाले होते . तर २५० लोकांनी अवयवदान करण्याची तयारी दर्शवली असून या नागरिकांनी स्पर्धेच्या ठिकाणी अवयदनासाठी फॉर्म भरले आहेत . 

मुख्य २१ किमी मॅरेथॉनमध्ये नाशिक, सांगली आणि माटुंग्याच्या स्पर्धकांची बाजी

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या २१ किमी मुख्य स्पर्धेत नाशिकच्या रणजित पटेल यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सांगलीच्या दीपक कुंभार यांनी द्वितीय आणि माटुंग्याच्या संतोष पटेल यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे