Mon, Jun 17, 2019 14:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : मालगाडीचे इंजिन १ तास बंद, मध्य रेल्वे वाहतूक खोळंबली

ठाणे : मालगाडीचे इंजिन १ तास बंद, मध्य रेल्वे वाहतूक खोळंबली

Published On: Dec 15 2017 9:11PM | Last Updated: Dec 15 2017 9:11PM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुकीचा खोळंबा काही कमी होत नाही. बदलापुर- वांगणी दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास मालगाडीचे इंजिन बंद झाले होते. त्यामुळे कर्जत खोपोलीकडे जाणारी वाहतूक ४० मिनिटे खोळंबली होती.

बदलापूर- वांगणी दरम्यान संध्याकाळी ५.५० ते ६.३२ या वेळेत कर्जत डाऊन मार्गावरून जाणारी मालगाडीचे इंजिन बंद झाले होते. त्यामुळे खोपोली, कर्जत गाड्या तसेच जलद मार्गावरील लोकलचा सुमारे एक तास खोळंबा झाला होता. त्याचा परिणाम अप मार्गावर देखील झाला, खोपोली कर्जत वरून येणाऱ्या लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या, त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल 25 मिनिटे उशिरा धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना सतत दुसऱ्या दिवशी देखील लोकलच्या खोळंब्याला सामोरे जावे लागल्याने प्रवाशि हैराण झाले होते.