Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्‍लास्‍टीक बंदी : ठाण्यात कारवाईचा दणका

प्‍लास्‍टीक बंदी : ठाण्यात कारवाईचा दणका

Published On: Jun 23 2018 1:45PM | Last Updated: Jun 23 2018 1:44PMठाणे : प्रतिनिधी

राज्यभरात प्लास्टिक बंदीस शनिवारी सुरवात झाली असून  ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या विशेष पथकाने प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरवात केली. प्रदूषण विभागाच्या  प्रमुख मनीषा प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ठाणे रेल्वे स्थानक, पोखरण रोड, मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट अशा सर्व  धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत फक्त भाजी मार्केटमधून जवळपास ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून जवळपास १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती यावेळी महापालिकेकडून देण्यात आली.

दुसरीकडे प्लास्टिक बंदी लागू केल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. मालाची पॅकिंग कोणत्या पिशवीत करायची असा त्यांच्यापुढे प्रश्न असून अशा प्रकारची पर्यावरण पूरक पारदर्शक पिशवी शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १२. ३० पर्यंत ५० जणांचा समावेश असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

दिवसभर ही कारवाई सुरु होती. रविवारपासून मात्र अशा प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून नित्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीमध्ये दंड वसूल केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.