Tue, Apr 23, 2019 07:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे शहराला ‘डिजिटल’ संजीवनी

ठाणे शहराला ‘डिजिटल’ संजीवनी

Published On: Jan 23 2018 1:51AM | Last Updated: Jan 23 2018 1:36AMठाणे ;  खास प्रतिनिधी

 ठाणे महापालिकेच्या विकासाचा आलेख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यास महत्वाचे योगदान करणारे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिका आयुक्त म्हणून नुकतीच 3 वर्षे पूर्ण केली. तसेच भारतातील पहिल्या डीजीसीटी प्लॅटफॉर्मचे  23 जानेवारी रोजी लोकार्पण होत आहे.

त्यानिमित्ताने दैनिक पुढारीने विकास कामांचा मांडलेला लेखाजोखा- 

 काही माणसे काहीच न बोलता कृतीतून व्यक्त  होतात; काही माणसे केवळ कृती करतात; तर काही माणसे इतकी आत्मविश्वासू असतात की ते जे बोलतात ते करुन दाखविण्याचे सामर्थ्य बाळगतात. लोकप्रतिनिधी आणि लोक यांच्यात सेतू बनून शहरासाठी, समाजासाठी, समाजातील लोकांसाठी काही तरी करण्याचे स्वप्न बाळगतात.आपल्या कार्यशैलीचा वेगळा ठसा, पाऊल खुणा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सगळयांनाच या सगळया गोष्टी जमतात असे नाही. पण ज्या व्यक्तीला या गोष्टी जमतात ती व्यक्ती लोकांच्या नजरेत खराखुरा हिरो ठरते.ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव  जयस्वाल हे असेच एक उदाहरण आहे की ज्यांनी आपल्याला जे करायचे आहे ते करुन दाखविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झाले.

तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर हे आजही ठाणेकरांच्या चर्चाचा विषय बनत असतात. त्यांनी केलेल्या विकास कामांसाठी धडाडीचे निर्णय घेताना लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांना अंगावर घेतले आणि ठाणे स्टेशन, मुलुंड चेकनाका परिसर अतिक्रमणे, लेडीजबार मुक्त करताना रस्ता रुंदीकरणाची मोहिम यशस्वी केली. ठाण्याचा चेहरामोहरा बदलण्यास झालेली सुरूवात ही आता प्रचंड वेगाने पुढे चालली आहे. तर तत्कालीन आयुक्त के.पी. बक्षी यांनी आर्थिंक स्थिती लावत महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सावरण्याचे महत्वपूर्ण काम केल. त्यानंतर आलेल्या नंदकुमार जंत्रे यांनी बीओटी तत्वावर कामे करून महापालिकेचा एकही पैसा खर्च न करता विविध प्रकल्प, वास्तू उभारल्या आणि विकासाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला ही वस्तूस्थिती आहे. 

शहराच्या सर्वांग सुंदर आणि सर्वंकष विकासाचा आलेख मांडताना त्यातून छोटया छोटया गोष्टीही सुटू नयेत याचे भान असणा-या व्यक्तीमध्ये संजीव जयस्वाल यांचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल. विकासाची भली मोठी स्वप्ने उराशी न बाळगतानागरिकांच्या मूलभूत समस्यांची सोडवणूक करुन त्यांना अभिप्रेत असलेल्या विकासाचा आलेख त्यांनी मांडायला सुरुवात केली.घन कचरा व्यवस्थापनाला चालना देणारे कच-यापासून इंधन, मलनिसारणासाठी छोटी छोटी मलनिसारण केंद्रे, चौक सुशोभिकरण, पदपथ अतिक्रमणमुक्त, उद्यानांची निर्मिती,रोड डिव्हायडर्स, सुशोभिकरण, मॉडेल रस्ते यांसारख्या छोटया-छोटया परंतु नागरिकांसाठी मोठया वाटणा-या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली.

सर्वसामान्यांमध्ये थेट भिडून त्यांच्या मनात घर करण्यास सुरूवात केली. त्याची सुरुवात त्यांनी घोडबंदर सर्व्हिसरोडपासून केली. अत्यंत खडतर असलेलात्यांच्या या उपक्रमाला सुरुवातीस प्रखर विरोध झाला. हामरीतुमरी, पोलीस तक्रारी वादाची झालर होती. बाधितांकडून कडाडून विरोध झाला. परंतु त्यांचेध्येय आणि त्याकामाच्या प्रती असलेली निष्ठा कर्तव्य पूर्ततायापुढे त्यांनी हा विरोध सकारात्मकतेमध्ये बदलला आणि घोडबंदररोड मोकळा झाला. पोखरणरोडनं.1ची ही तीच अवस्था. पण लोकांना, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांनी पोखरणरोडनं.1 रुंदीकरणाची किमयाही साध्य केली. या विस्थापितांचे रुंदीकरणापूर्वी पुनर्वसन करून त्यांनी नागरिकांचा विरोध सौम्य केला.

मागणीपूर्वीच   घरे मिळाल्याने रस्ता रुंदीकरणाला होणारा विरोध मावळा. काही राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी आयुक्तांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न करून मुख्यालयात घुसून विरोध करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कुठल्याही प्रशासकीय अधिकार्‍याला त्रासदायक होता. परिणामी त्यांना सुरक्षा घेऊन रस्ता रुंदीकरणाची मोहिम राबवावी लागली. आज पोखरण रोड एक आणि दोन पाहिल्यास नव्या ठाण्याची झलक दिसून दिले. आपण नक्की ठाण्यातही आलो आहोत ना अशी शंका येण्यासारखे रस्ते चकाचक झालेले आहेत. भव्य दिव्य रस्ते पाहून ठाण्याची नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे.

ख र्‍या अर्थाने आव्हानात्मक काम होते ते स्टेशन रोड परिसर अतिक्रमणमुक्त करुन तो मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे. परंतु लोकांशी संवाद साधून, त्यांना त्यांच्या पुनर्वसनाचा विश्वास देऊन हे कामही त्यांनी लीलया पार पाडलं. जवळपास 1000 पेक्षा जास्त बाधित बांधकामे तोडून तेथील रस्त्याच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. खरे तर हे नागरिकांसाठी अनाकलनीय होतं, अनपेक्षित होते. पण जयस्वाल यांनी ते करुन दाखविले.  म्हणूनच एका 80 वर्षांच्या वृध्दाने त्यांच्या या उपक्रमाचे चॉकलेट वाटून स्वागत करण्यापासून ते सर्वसामान्य रिक्षावाल्यापर्यंत सा-यांनीच जयस्वालयांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दाखविला.

नागरिकांनी चक्क फटाके वाजवून उपक्रमाचे स्वागत केले. एखादया सनदी अधिका-याला असा सन्मान मिळणे हे अभावानेच होते. तो जयस्वाल यांना मिळाला. एक टीम म्हणून काम करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले आणि तेही सर्वांच्या बरोबर राहिले. म्हणूनच त्यांचा स्टेशन परिसरात शेकडो लोकांच्या उपस्थितीत सत्कार झाला. त्यांच्या आत्मविश्वासाचा, ध्येयाचा आणि कर्तव्यपूर्तीचा सन्मान झाला. जयस्वालरुपी ही संजीवनी ख-या अर्थाने स्वच्छ;सुंदर आणि समृध्द शहरासाठी संजीवनी ठरणार आहे. 

ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलताना डिजीटल ठाण्याची जोड देऊन देशाच्या नकाशावर नाव कोरणार्‍या  ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांना नुकतीच 3 वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षांच्या कालखंडात त्यांनी केलेली नियोजनबद्ध  विकास कामे हे आगामी 30 वर्षाचा वेध घेऊन केलेली आहेत. पायाभूत सुविधांपासून ते शहराच्या सौंदर्यापर्यंत, क्रीडा क्षेत्रापासून ते सांस्कृतिक परंपरेपर्यंत आणि आरोग्यापासून ते पर्यावरणपर्यंत या सर्व स्तरांवर विकासाची सोनेरी झालर त्यांनी पांघरली आणि लोकांनी डेस्टीनेशन ठाण्याला पहिली पसंती देण्यास सुरूवात केली. पालिकेचा एकही पैसा खर्च न करता सुमारे 3 हजार कोटींची विकास कामे करून घेतना प्रचंड मेहनत करुन आधुनिक ठाण्याचा साज चढविण्याचा प्रयत्न केला. अधिका-यांपासून ते नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात या शहराविषयी दायित्वाची भावना निर्माण केली. त्यामुळेच त्यांच्या कारकीर्दीची 3 वर्षे म्हणजे ठाण्याच्या भविष्याला कलाहटणी देणारी म्हणावी लागतील.

सआगामी काळात सुमारे 550 कोटी रुपये खर्चून ठाण्यातील विविध ंभागाच्या रस्त्यांचा कायापालट केला जाणार आहे. दुर्लक्षित असलेला दिवा, मुंब्रा, कळव्याचा झालेला विकास हा आयुक्तांच्या कठोर आणि निर्भिड निर्णय घेण्यामुळे झालेला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आयुक्तांनी केलेल्या विकास कामांची विशेष दखल घ्यावी लागली आणि जाहीर सभांमध्ये तसा उल्लेखही करावा लागला.

सख-या अर्थाने जयस्वाल यांच्या विकास पंखाना बळ मिळाले ते स्मार्टसिटीच्या निमित्ताने. त्यांनी नागरिकांशी, नगररचनाकारांशी, आर्किटेक्ट आणि या क्षेत्रातील तज्ञांशी मुक्त संवाद साधला. त्यांच्या मनात ठाण्याच्या विकासाचे जे मॉडेल होतेे ते प्रत्यक्षात उतरवताना काय करायला हवे याचा विचार केला आणि त्या पध्दतीने स्मार्टसिटी प्रकल्पाची मांडणी करुन तो केंद्र आणि राज्य सरकारला सादर केला.

सस्मार्टसिटीचा जो आराखडा जयस्वाल यांनी मांडला होता त्याला सुरुवातीस काही लोकांनी आक्षेप घेतला. परंत ुनंतर मात्र त्याच लोकांनी तो आराखडा उचलून धरला.जवळपास 6 लक्ष लोकांशी त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद साधला. झोपडपट्टीतील नागरिक, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकजवळपास सर्वच थरांतील लोकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या मनात विकासाचे ते चित्रआहेते जाणून घेतले.


मेट्रो रेल्वे, टाटा कॅन्सर, हॉस्पिटल, संकरा नेत्रालय यांसारख्या उच्चदर्जाच्या आरोग्य सुविधा न्यूयॉर्कच्याधर्तीवर 35 एकर जागेत सेंट्रलपार्क,ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, काम करणा-या महिलांसाठी वसतिगृह,बहुमजली पार्किंग सुविधा, बहुस्तरीय वाहतूक सुविधा, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, तलाव सुशोभिकरण व संवर्धन, क्रीडा सुविधा, सायकल लेन,पादचारीपूल, भुयारी गटारे आणि  विकेंद्रित मलनिःसारण केंद्रे, पाणीपुरवठा, एलईडीलाईट अशा अनेक मूलभूत गोष्टींचाअंतर्भाव असलेला हा आराखडा ख-या अर्थाने या शहराचा कायापालट करणारी संजीवनीच आहे. महत्वाची गोष्ट अशी की त्यातील काही गोष्टींची अंमलबजावणी ही सुरु झालेली आहे.

   अर्थात या सर्व गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी महापालिकेची आर्थिक गाडीही रुळावर असायला हवी याचे भानही त्यांना आहे. कर्मचा-यांना पगार द्यायलाही पैसे नव्हते अशा परिस्थितीत त्यांनी विस्कटलेली आर्थिकघडी नीट बसवायला सुरुवात केली. सातत्याने अधिकारी, कर्मचारी यांच्याशी समन्वय साधत, आढावा बैठका घेत महापालिकेस आर्थिक कोंडीतून बाहेर काढले. जकात कर रद्द झाल्यानंतर पालिकेला आर्थिक स्थैर्य मिळवून देत विकासाला चालना दिली.