Tue, Apr 23, 2019 06:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यातील पब, हुक्का पार्लर्सवरील कारवाई तूर्तास टळली

ठाण्यातील पब, हुक्का पार्लर्सवरील कारवाई तूर्तास टळली

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 1:08AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या बाहेर हॉटेल्स व्यावसायिकांची गर्दी पालिका आयुक्त आणि हॉटेल्स व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन  शुक्रवारी 5 वाजता करण्यात आले होते. त्यापूर्वीच मोठ्या संख्येने हॉटेल्स व्यावसायिकांनी  महापालिकेच्या गेटबाहेर गर्दी केली होती. त्यानंतर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही वेळाने पोलिसांनादेखील पाचारण करण्यात आले. दोन तास बैठक होईपर्यंत सर्व हॉटेल्स व्यावसायिक गेटवर निर्णयाची वाट बघत होते. 

अग्निशमन विभागाची एनओसी न घेणार्‍या ठाण्यातील बार, पब आणि हुक्का पार्लर सील करण्याची कारवाई 15 दिवस टळली आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु असलेल्या पालिका आयुक्त आणि हॉटेल्स व्यावसायिकांच्या बैठकीमध्ये पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या 15 दिवसांमध्ये सर्व हॉटेल्सनी एनओसी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निदान 15 दिवस पालिकेची कारवाई टळली असल्याने हॉटेल्स व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.