Tue, Jul 16, 2019 13:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंब्रा बाय-पासची संरक्षक भिंत घरावर कोसळली 

मुंब्रा बाय-पासची संरक्षक भिंत घरावर कोसळली 

Published On: Jun 09 2018 6:25PM | Last Updated: Jun 09 2018 6:24PMठाणे : अमोल कदम

शुक्रवार रात्री पासून ठाणे आणि आजूबाजूच्या उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी दुपारी मुंब्रा बाय-पास रस्त्यांची संरक्षित भिंत उदय नगर येथील भांगे चाळीवर कोसळली. परंतु यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. 

पावसाने गेल्‍या दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. डोंगर भागावरील भूभाग सरकण्याची दाट शक्यता असल्याचे ठाणे महानगर पालिकेच्या वतीने डोंगर पायथ्याशी असणाऱ्या नागरी वस्तीतील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. शनिवार दुपारी चारच्या सुमारास मुंब्रा देवी डोंगर येथील बाय-पास रस्त्याची संरक्षित भिंत पावसाच्या पाण्याने खचली आणि उदयनगर जवळील भांगे चालीवर कोसळली. यामध्ये दिलीप जाधव यांच्या घराचे नुकसान झाले आहे.  संरक्षित भिंतीच्या दगड घरावर पडल्यामुळे कौले आणि पत्रे फुटले आहेत. घटना स्थळी अग्नीशमन दल, आपत्ती व्यवस्थान पथक आणि पोलीस दाखल झाले असून, कोणतीही जीवित हानी झाली नाही.