Wed, Jul 17, 2019 10:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय दरोडेखोरांना केले गजाआड

ठाणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय दरोडेखोरांना केले गजाआड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : खास प्रतिनिधी 

बांगलादेशातून ढाकामार्गे भारतात दाखल झालेल्या ५ जणांच्या आंतरराष्ट्रीय  दरोडेखोरांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांना २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांनी काशिमिराप्रमाणे मुंबईत आणखीन काही ठिकाणी दरोडे, चोऱ्या केल्या आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत. 

घोडबंदर रोडवरील चेन ब्रिजजवळील द्वारका हॉटेलसमोरील घरात घुसून घरमालकाला बांधून घालुन सुमारे ९ लाखांचा ऐवज पळविला होता. ही  घटना २२ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ महेश पाटील यांनी तात्काळ विशेष पथकांची नियुक्ती करून तपास सुरू केला. त्यावेळी एक कार निष्पन्न झाली होती. ती कार वसईतून वर्सोवामार्गे येत असल्याची खबर मिळाली यावेळी पोलिसांनी सापळा रचून पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले. त्यात मोहंमद पलश मोहंमद इस्माईल हवालदार, लुकमान चिना  मियाँ , बप्पी आकूबर शेख, मोहमदद शेख, महंमद अक्रम इरफान अली  (सर्व राहणार बांगलादेश ) यांचा समावेश आहे. यातील तिघेजण ढाक्यावरून भारतात विमानाने आले. तर दोघे बेकायदेशीररित्या भारतात आले होते. यांनीच दरोडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून दरोड्यातील सर्व हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. 


  •