Thu, Nov 15, 2018 22:23



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपच्याच नगरसेवकाने दिली भाजप पुरस्कृत नगरसेवकाच्या हत्येची सुपारी

भाजपच्याच नगरसेवकाने दिली भाजप पुरस्कृत नगरसेवकाच्या हत्येची सुपारी

Published On: Dec 23 2017 2:33AM | Last Updated: Dec 23 2017 1:31AM

बुकमार्क करा





ठाणे : प्रतिनिधी

डोंबिवलीतील भाजप पुरस्कृत नगरसेवकाच्या हत्येची सुपारी भाजपच्याच नगरसेवकाने दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने गणेशपुरी पोलीस ठाण्यात नगरसेवक महेश पाटीलसह 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्र. 108 चे भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी डोंबिवलीतील भाजपच्याच बाहुबली नगरसेवक महेश पाटील यांनी एक कोटी रुपयात दिल्याची धक्कादायक कबुली दरोड्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीने दिली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडी-वाडा रोडवरील सशस्त्र दरोडा प्रकरणात एकूण 6 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या 6 पैकी एका आरोपीने आपणास कुणाल पाटील यांच्या हत्येसाठी एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची खळबळजनक कबुली पोलीस तपासा दरम्यान दिली.

यावर गणेशपुरी पोलीस ठाण्यात नगरसेवक महेश पाटील यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आंधळे यांनी दिली.