Thu, Feb 21, 2019 07:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवलीचे वातावरण तापले, पाऱ्याने ओलांडली पस्तीशी

कल्याण-डोंबिवलीचे वातावरण तापले, पाऱ्याने ओलांडली पस्तीशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

वातावरणातील बदलाने तापमानवाढीचे परिणाम कल्याण-डोंबिवलीतही पाहायला मिळत आहेत. रविवारी येथील तापमानात अचानक मोठी वाढ झाली. सोमवारी दुसऱ्या दिवशीही कल्याण डोंबिवलीतील पाऱ्याने सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पस्तीशी ओलांडली. त्यावरून सोमवारचा दिवसही कल्याण-डोंबिवलीकरांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यात आधी ढगाळ वातावरण नंतर रात्री पावसाच्या सरी मग मध्येच वातावरणात रात्रीच्या सुमारास आलेला गारठा असे बदल अवघ्या काही दिवसांत पाहायला मिळाले. तर, रविवारी म्हणजे २५ मार्च रोजी अचानक कल्याण-डोंबिवलीतील तापमानाने उसळी घेतली. कालचा रविवार यंदाच्या मौसमातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. त्याचीच पुनरावृत्ती सोमवारीही होणार असे दिसत आहे. सकाळपासून पुन्हा वातावरण चांगलेच तापलेले जाणवत आहे. सकाळी अवघ्या साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इथल्या पाऱ्याने पस्तीशी ओलांडलेली पाहायला मिळत आहे. 

सकाळी 9.37 वाजण्याच्या दरम्यान कल्याणात 35.7 डिग्री सेल्सिअस इतक्या चढ्या तापमानाची नोंद झाली आहे. अद्याप दुपारचा प्रहर बाकी असतानाच हा पारा 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या तापमानाला तोंड देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीकरांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे डॉक्टर मंडळींनी आवाहन केले आहे.

Tags  :  kalyan, dombivli, temperature


  •