Thu, Sep 20, 2018 14:32



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : कनिष्ठ महाविद्यालये आज बंद; परीक्षेवर परिणाम(video)

मुंबई : कनिष्ठ महाविद्यालये आज बंद; परीक्षेवर परिणाम(video)

Published On: Feb 02 2018 12:30PM | Last Updated: Feb 02 2018 12:40PM



मुंबई : प्रतिनिधी

वारंवार झालेली आंदोलने, आश्‍वासने आणि विविध मागण्यांसाठी शालेय शिक्षण विभागाचा वेळकाढूपणा याच्या निषेधार्थ राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी 2 फेब्रुवारीला महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसण्याची शक्यता आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी व पुर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे राज्यात पाच टप्प्यात आंदोलन करण्यात आले. आता  चौथ्या टप्प्यात 2 फेब्रुवारी  रोजी राज्यातील सर्व  कनिष्ठ महाविद्यालये बंद करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर व मुंबईत आझाद मैदान येथे  जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी सांगितले.

प्रमुख मागण्या 

 -1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे

  -2012 पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन देणे.

  -सर्व शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी देणे.

  -कायम विना अनुदानित कडील शिक्षकांना अनुदान द्यावे.

  -माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे.

  -2003 ते 2010--11 पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे.

  -सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा.