Fri, May 24, 2019 09:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यातील शिक्षकाला चौथ्यांदा १०० गुण

ठाण्यातील शिक्षकाला चौथ्यांदा १०० गुण

Published On: Jan 09 2018 2:02AM | Last Updated: Jan 09 2018 2:01AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

देशातील प्रमुख मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गरजेची असलेल्या कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट म्हणजेच कॅट परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथे राहणारे शिक्षक पॅट्रिक डिसोझा यांना कॅटमध्ये चौथ्यांदा 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 20 विद्यार्थ्यांना 100 

पर्सेंटाईल मिळाले आहेत. या 20 विद्यार्थ्यांमध्ये 2 मुलींचा आणि तीन अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

गेल्या 26 नोव्हेंबर मध्ये झालेल्या या परीक्षेला देशभरातून तब्बल 1 लाख 99 हजार 623 विद्यार्थी बसले होते. देशभरातून 140 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. ठाणे येथे वर्तकनगर येथे राहणार्‍या 41 वर्षीय पॅट्रिक डिसोझा यांना या परीक्षेत 100 गुण मिळाले आहेत. त्यांची 100 गुण मिळवल्याची चौथी वेळ आहे. आतापर्यत त्यांनी 14 वेळा कॅट परीक्षा दिली आहे. 1996 साली डिसोझा यांनी कॅट परीक्षा दिली होती. कॅट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे कोचिंग क्‍लास चालवतात. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि परीक्षेची माहिती मिळावी म्हणून मी ही परीक्षा देत असल्याचे त्यांनी पुढारीशी बोलताना सांगितले. दादर आणि ठाणे येथे मी सुमारे 200 विद्यार्थ्यांचे कोचिंग क्‍लासेस घेत असल्याचेही ते म्हणाले. दरवर्षी वेगळ्या थेरीचे प्रश्‍न विचारले जातात, नेमके काय प्रश्‍न विचारले आणि विद्यार्थ्यांना या परीक्षेचे परिपूर्ण मार्गदर्शन मिळावे यासाठी मी परीक्षा देतो असेही त्यांनी सांगितले.