Mon, Jun 24, 2019 21:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज यांच्या घरासमोर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

राज यांच्या घरासमोर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jun 27 2018 1:40PM | Last Updated: Jun 27 2018 4:54PMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोर एका कला शिक्षकाने  बुधवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रहेजा कला महाविद्यालयात शिकवणार्‍या भारत हरी गीते यांनी महाविद्यालयात आपला मानसिक छळ होत असल्याची चिठ्ठी आदल्याच दिवशी लिहून ठेवली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यामुळे राज यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, या उद्देशाने त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याचे शिक्षकाने एका पत्रात लिहिले होते. त्यानुसार हा शिक्षक बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास कृष्णकुंजबाहेर पोहोचला आणि काही तरी द्रव पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राज यांचे कुटुंबीय त्यावेळी घरी होते. त्यांनी त्या शिक्षकाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत शिक्षकाने कोणता तरी द्रव पदार्थ प्राशन केला, असे त्याच्या भावाने सांगितले. यानंतर शिक्षकाला उपचारांसाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

रहेजा कला महाविद्यालयाच्या प्राचार्य राधा आंबेकर यांच्यावर गीते यांनी आरोप केले आहेत. माझे कला महाविद्यालय वाचावे म्हणून मी गेली चार वर्षे प्रयत्न करत होतो. पण महाविद्यालय बंद करण्याच्या नादात प्रायार्य राधा आंबेकर यांनी माझ्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा छळ करण्यास सुरुवात केली. 

पुढाकार घेत असल्याने मला धमकावणे सुरू केले, असे गीते यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. महाविद्यालयातील वैराळ नावाच्या एका विद्यार्थ्यानेही राधा आंबेकर यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती, असा आरोप गीते यांनी केला.

No automatic alt text available.

No automatic alt text available.