Sat, Aug 17, 2019 16:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिसच्या विद्यार्थ्यांना प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा! (Video)

टिसच्या विद्यार्थ्यांना प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा! (Video)

Published On: Mar 07 2018 2:55PM | Last Updated: Mar 07 2018 2:55PMमुंबई : वार्ताहर 

देवनारच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत (टिस) शिकणाऱ्या एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची अचानक शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. हॉस्टेल व जेवणाचा खर्च विद्यार्थ्यांकडून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात गेल्या पंधरा  दिवसांपासून संस्थेच्या मुख्य प्रवेशव्दारसमोर विद्यार्थी आंदोलन करत आहेत. 

आज दुपारी १२ वाजता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकरांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून चाललेल्या आंदोलनात कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.