Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : कशेडी घाटात टँकर घसरला; सुदैवाने जिवीतहानी नाही

रायगड : कशेडी घाटात टँकर घसरला; सुदैवाने जिवीतहानी नाही

Published On: Aug 18 2018 5:58PM | Last Updated: Aug 18 2018 5:51PMपोलादपूर : प्रतिनिधी

मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भरधाव टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने पार्टेवाडी गाव हद्दीत एका वळणावर टँकर घसरला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, टँकर चालक राधेश्याम प्रजापती (वय- ३७ रा. उत्तरप्रदेश) हा टँकर क्रमांक एम एच ४३ यु १८०१ घेऊन कुडाळ वरून मुंबईकडे जात होता. कशेडी घाटात पार्टेवाडी गाव हद्दीत प्रतापगड दर्शन फलकाजवळ आला असता येथील एका अवघड वळणावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या विरुद्ध दिशेला दरीच्या बाजूला घसरला. मात्र, सुदैवाने यात चालक बालबाल बचावला.

कशेडी घाटातील पार्टेवाडी हद्दीतील या डेंजर झोन समजल्या जाणाऱ्या स्पॉटवर गेल्या दोन महिन्यात टँकर, कंटेनर, ट्रक, आयशर टेम्पो, आदी वाहने पलटी होऊन, घसरून तसेच दरीत कोसळून ८ ते १० अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तर दुचाकी घसरून या ठिकाणी अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्यापही या ठिकाणी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.