Fri, Feb 22, 2019 17:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :अशोक चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : अशोक चव्हाण

Published On: Jan 07 2018 10:17AM | Last Updated: Jan 07 2018 10:17AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा प्रकरणात जे काही घडले, ते सरकारचे अपयश आहे. मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून याप्रकरणी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. टिळक भवन येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी राज्यात जातीय तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेली ही घटना सरकारचे अपयश असल्याची भावना व्यक्‍त केली.

गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय  तणाव निर्माण झाला. सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी फडणवीस यांनी सरकारच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची आवश्यकता असल्याचे अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.