Sun, Sep 23, 2018 00:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई : सोनवणे हत्‍या प्रकरणातील आरोपीचा तुरुंगात मृत्यू

नवी मुंबई : सोनवणे हत्‍या प्रकरणातील आरोपीचा तुरुंगात मृत्यू

Published On: Dec 23 2017 8:33AM | Last Updated: Dec 23 2017 8:33AM

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी 

नेरूळ येथे झालेले स्वप्निल सोनवणे हत्या प्रकरणातील  मुख्य आरोपी असलेले  मुलीचे वडील राजेंद्र नाईक याचा तळोजा तुरूंगामध्ये मृत्यू झाला. नाईक याचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.

१३ जुलै २०१६ रोजी नववीत शिकत असलेल्या स्वप्निल सोनवणे याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी  एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आले होते. मुलीची आई-वडील, दोन भावांना यामध्ये अटक करण्यात आली होती.