Sat, Apr 04, 2020 17:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी शेतकरी’ला ‘खिंडार’ 

राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी शेतकरी’ला ‘खिंडार’ 

Last Updated: Feb 19 2020 1:17AM

पत्रकार परिषदेत बोलताना माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंतमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेला व्यापक घटना नाही. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे योगदान नसल्याचा प्रत्यय व शेतकऱ्यांच्या ध्येय धोरणाला तिलांजली दिल्याने बाहेर पडत आहे. सध्यस्थितीत माजी खासदार शेट्टी यांच्या संघटनेमध्ये शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये कुठल्याही प्रकारची आस्था राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडत असल्याची माहिती माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ते मुंबई मराठी पत्रकार संघात दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

वाचा :पंढरीनाथ पठारे यांना शिवछत्रपती पुरस्‍कार घोषित 

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी, सध्या राज्यातील महाविकास आघाडी राष्ट्रीय प्रश्नांत लक्ष घालून जनतेचे लक्ष विचलित करत आहे. त्यामुळे आम्ही फक्त बेरोजगार व शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी नवीन संघटना स्थापन करुन या प्रश्नी महाविकास आघाडीला जाब विचारणार आहोत, असे सांगितले. यावेळी नाशिक येथील युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, परभणी येथील माणिकराव कदम, नानासाहेब बच्छाव, गजानन अमदाबादकर आदींनी स्वाभिमानीला रामराम ठोकला असल्याचे सांगितले.

वाचा :रतन टाटा भावूक!, शेअर केली सफाई कामगाराच्या मुलाची कविता

दशरथ सावंत म्हणाले, मी शेतकरी संघटनेचे शरद जोशी, समाजवादी नेते एस. एम. जोशी, आचार्य अत्रे यांच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये काम केले आहे. स्वाभिमान शेतकरी संघटनेमध्ये मी गेली २० वर्ष काम करीत होतो. परंतु ; राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना ही विकास कामे ही ट्रेन सारखी आहे. त्यामध्ये प्रवासी नाहीत व अशा रिकाम्या ट्रेनमधून आता आम्हाला प्रवास करण्याची इच्छा नाही. त्याचबरोबर प्रतिवर्षी केवळ ऊसाच्या नावावर जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे परिषद घेतात. केवळ ऊसाच्या प्रश्नांवर संघटना चालत नाही. अनेक शेतकऱ्यांची पिके आहेत.

वाचा :डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग (video)

सुबोध मोहिते म्हणाले, सध्या महाराष्ट्र सरकार मध्ये तरुणांचे भविष्य काय याबाबत सरकार कुठल्याही प्रकारची उत्तर देत नाही. सध्याचे युवक व युवती या नशेच्या आहारी गेले आहेत, असा नॅशनल क्राईम रिपोर्ट आहे. याबाबत सरकारकडे कुठल्याही प्रकारचे उत्तर नाही. भारतीय रेल्वे मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा रेल्वेच्या सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त आहे. त्याकरिता अधिकचे पैसे जात आहेत, म्हणून रेल्वेमध्ये सध्या भरती बंद आहे. याचे उत्तर केंद्र सरकारकडे नाही. सध्याच्या स्फोटक स्थितीला केंद्र सरकार व राज्य सरकार जबाबदार आहे. दिल्लीमध्ये अरविंद केंद्री वाल यांच्या सरकारांनी जशी कामगिरी केली तशीच कामगिरी आम्ही करणार आहोत.

वाचा :माजी मुख्यमंत्र्यांनी माहिती लपविली; सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला निर्णय