Mon, Jan 21, 2019 23:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिटवाळ्यात रेल्वे रुळालगत सापडले स्त्री जातीचे जिवंत  अर्भक

टिटवाळ्यात रेल्वे रुळालगत सापडले स्त्री जातीचे जिवंत अर्भक

Published On: Aug 28 2018 5:13PM | Last Updated: Aug 28 2018 5:12PMटिटवाळा: प्रतिनिधी

टिटवाळा नजीकच्या बल्याणी परिसरातील रेल्वे रुळालगत झाडांच्या झुडपात  स्त्री जातीचे एक महिन्याचे जिवंत अर्भक सापडले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या  रेल्वे रुळापासून काही अंतरावर बल्याणी परिसरात  एका महिन्याचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक माळरानावर गवतात सापडून आले. काही नागरिकांच्या मदतीने ही घटना समोर आली असुन मानवतेला काळिमा फासणारी घटना बल्याणीत घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर अर्भक रेल्वे पोलिस व टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबतचा  अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.