Wed, Jun 03, 2020 18:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये मुंबईच्या सन्नी पवारला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार 

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये मुंबईच्या सन्नी पवारला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार 

Published On: May 16 2019 8:31AM | Last Updated: May 16 2019 8:31AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील कलिना येथील कंची कर्वेनगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या सन्नी पवारने १९ व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कारावर नाव कोरले. ‘चिप्पा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. 

सन्नी प्रतिभाशाली बाल कलाकार असून कलिना येथील कंची कर्वेनगर या झोपडपट्टीत राहतो. सन्नीने अमेरिकेतील न्युयॉर्क येथील १९ व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पटकावला. सन्नीने यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गर्थ डेव्हिस यांच्या २०१६मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे.

पुरस्कार मिळाल्याने मी खूपच खूश असून पुरस्काराचे श्रेय माझ्या पालकांना जाते. मला रजनीकांत यांच्याप्रमाणे मोठा कलाकार होण्याचे स्वप्न आहे.  बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हींमध्ये काम करायची इच्छा सन्नीने व्यक्त केली.