Tue, May 21, 2019 12:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहा हजार शाळांतील विद्यार्थ्यांची बँक खातीच नाहीत

सहा हजार शाळांतील विद्यार्थ्यांची बँक खातीच नाहीत

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी

शासनाने विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना तातडीने बँक खाते उघडण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापही राज्यातील तब्बल सहा हजार शाळांतील लाखो विद्यार्थ्यांचे खातेच उघडलेले नाहीत. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडताना ग्रामीण भागातील पालकांना अडचणी येत असल्याने यंदा तरी शाळा सुरू होताना गणवेशाचे पैसे खात्यावर मिळणार का, असा प्रश्‍न आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविण्याची योजना शासनाने अंमलात आणली. त्यानुसार मागासवर्गीय विद्यार्थी, सर्व मुली आणि दारिद्य्ररेषेखालील विद्यार्थ्यांना (पहिली ते आठवी) गणवेश पुरविण्यात येत होते; प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश पुरविण्यासाठी 400 रुपये एवढे अनुदान प्रत्येक देण्यात येते. दरवर्षी शालेय गणवेश खरेदीत होणारा गैरव्यवहार व अनियमितता टाळण्यासाठी सरकारने यावर्षीपासून गणवेशाचे अनुदान थेट विद्यार्थी व पालकांच्या संयुक्‍त बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यात असलेल्या तब्बल 83 हजार 900 शाळांतील विद्यार्थ्यांची खाती उघडलेली आहेत. तर 5 हजार 991 शाळांतील  विद्यार्थ्यांची खाती उघडण्याची बाकी आहेत. पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची खाती उघडली नसल्याचे यू-डायसमधून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

Tags : mumbai, mumbai news, six thousand schools, students, do not have accounts,