Fri, Jul 19, 2019 20:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकार हमसे डरती है! पुलिस को आगे करती है!

सरकार हमसे डरती है! पुलिस को आगे करती है!

Published On: Jan 04 2018 2:44PM | Last Updated: Jan 04 2018 2:44PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

विलेपार्ल्यात छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह रिचा सिंग अलाहाबाद विद्यापीठ आणि जेएनयू विद्यापीठातून प्रदिप मरवाल यांना अटक करण्यात आली असून, पोलिसांवर दडपशाहीचा आरोप करण्यात आला आहे. छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात येत असताना 'सरकार हमसे डरती है! पुलिस को आगे करती है!' अशा घोषणा विद्यार्थी देत होते. 

दरम्यान, विधान परिषदेचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह अलाहाबाद विद्यापीठाची विद्यार्थिनी रिचा सिंह आणि जेएनयू विद्यापीठाचा विद्यार्थी प्रदिप मरवाल यांना अटक करण्यात आली असून, पोलिस दडपशाही करत असल्याचा आरोप मरवाल याने केला आहे. याबाबत आमदार कपिल पाटील म्हणाले, 'हे फॅस्टिस सरकार आहे. भीमा कोरेगाव दगंलीतील आरोपीला अटक न करता देशभरांतून आलेल्या विद्यार्थ्यांना अटक केली. त्यांच्याकडून शैक्षणिक धोरणावर चर्चा केली जाणार होती. परंतु, पोलिसांनी त्यांना कार्यक्रमाआधीच अटक केली.'

संबंधित बातम्या

जिग्नेश, उमर खलिद यांच्या विरोधात सर्च वॉरंट

जिग्नेश मेवाणी, खालिद मुंबईत 

जिग्नेश मेवानीच्या सभेला परवानगी नाकारली