Tue, Jan 22, 2019 18:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल रोको आंदोलन मागे, रेल्वे वाहतूक पूर्वपदावर

रेल रोको आंदोलन मागे, रेल्वे वाहतूक पूर्वपदावर

Published On: Mar 20 2018 12:51PM | Last Updated: Mar 20 2018 12:51PMमुंबई : प्रतिनिधी

रेल्वे भरतीतील गोंधळाविरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी दादर-माटुंगा स्थानकादरम्यान  केलेला रेल रोको तब्बल साडेतीन तासानंतर मागे घेण्यात आला. रेल्वे अधिकारीवर्गाबरोबर चर्चा करुन आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर रेल्वे वाहतुक हळू पूर्वपदावर येऊ लागली. एैन गर्दीवेळी आंदोलन करण्यात आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी कामावर जाणार्‍या नोकरदार वर्गाचे यामुळे हाल झाले.

अप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अधिकारीवर्गाशी बोलून तूर्त रेल रोको मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थी ट्रॅकवरून हटल्यानंतर रेल्वे मार्ग मोकळा झाल्याने रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत.  मात्र ही सेवा पूर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.