Tue, Nov 20, 2018 04:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बर मार्ग पनवेल ते सीएसएमटीपर्यंत वाहतूक ठप्प (व्हिडिओ)

हार्बर मार्ग पनवेल ते सीएसएमटीपर्यंत वाहतूक ठप्प (व्हिडिओ)

Published On: Jan 02 2018 5:15PM | Last Updated: Jan 02 2018 5:15PM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

पुणे, भीमा कोरेगाव येथे काल झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चेंबूर ते गोवंडी दरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरल्याने हार्बर मार्गवरील लोकल वाहतूक पनवेल ते मुंबई सीएसएमटी दरम्यान ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

स्थानकावर प्रवाशी लोकलची वाट पाहत आहेत तर लोकल गाड्या रुळावरच थांबून आहेत असे चित्र आहे. स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला असून आंदोलकांना बाजूला करण्याचे काम सुरू आहे.