Sat, May 30, 2020 02:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टॅक्सी चालकाच्या मुजोरीने सुप्रिया सुळे हैराण

टॅक्सी चालकाच्या मुजोरीने सुप्रिया सुळे हैराण

Published On: Sep 12 2019 3:10PM | Last Updated: Sep 12 2019 8:44PM

खासदार सुप्रिया सुळेमुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात सर्वत्रच टॅक्सी आणि रिक्षाचालकांचा उन्माद नवीन नसला, तरी आता खासदार सुप्रिया सुळेंनाही तसाच अनुभव आला. नेहमीच गजबजलेल्या मुंबईमधील दादर रेल्वे स्थानकावर सुप्रिया सुळेंना एक कटू अनुभव आला.  

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी उन्मादी टॅक्सी चालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी ट्विट करून सांगितले, की टॅक्सीचालकाने घुसखोरी करून आपली वाट अडवून नाहक त्रास दिला.  यासंबंधी रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.

सुळे यांनी सांगितले, की दादर स्थानकावर मला विचित्र अनुभव आला. कुलजित सिंह मल्होत्रा नावाचा इसम रेल्वेमध्ये येऊन टॅक्सी हवी आहे का? विचारणा करू लागला. दोनवेळा नकार देऊनही त्याने माझा रस्ता अडवला आणि विनाकारण त्रास दिला. यानंतरही निर्लज्जपणे तो फोटो काढण्यासाठी पोझ देत होता.

ट्विटमधून त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केली. या प्रकरणात लक्ष घालावे, जेणेकरुन इतर प्रवाशांना अशा परिस्थितीतून सामोरे जावे लागणार नाही. दलालीला कायद्याने परवानगी असेल, तर रेल्वे स्थानके आणि विमानतळांवर त्याची परवानगी नसावी. फक्त अधिकृत टॅक्सी स्टॅण्डवरच परवानगी असावी.

दरम्यान, त्या व्यक्तीला दंड ठोठावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी कारवाई केल्याने आरपीएफचे आभार मानले.