Thu, Jun 04, 2020 07:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना : नागरिकांचे स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्देश 

कोरोना : नागरिकांचे स्थलांतर थांबवा; राज्यपालांचे निर्देश 

Last Updated: Mar 28 2020 4:12PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

 

 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शनिवारी राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातील कोरोना व्हायरस संक्रमण व लोकांचे स्थलांतर याबाबत माहिती घेतली. 
कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली. 

वाचा : आधी कोरोना टेस्टिंग किटला जन्म मग बाळाला; देशातील पहिल्या किटवर मराठी रणरागिनीची मोहोर!

सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसेच अशासकीय संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असे राज्यपालांनी सांगितले.  

वाचा : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५९ वर

ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेत, त्यांना देखील थांबवून घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले. 

राज्यपालांनी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकणव पुणे येथील विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.  

वाचा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; मुंबईतील डॉक्टरांचे पथक मिरजेत दाखल ​​​​​​​