डोंबिवली : वार्ताहर
वासनांध सावत्र बापाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वांरवार लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या जबानीवरून वासनांध बापाविरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मनोज गुप्ता (37) असे आरोपीच बापाचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे.
पहिल्या पत्नीला काही कारणावरून नराधम मनोजने घटस्फोट दिला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या आईशी दुसरा विवाह करून कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात पत्नी व पीडित अल्पवयीन मुलीसह तो राहतो. गेल्या तीन वर्षापूर्वी या नराधम सावत्र बापाची वाईट नजर पीडित मुलीवर पडली. त्यावेळी पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर घडलेली घटना कुणाला सांगितली, तर तुझ्या आईला मारून टाकण्याची तिला धमकी दिली. या धमकीमुळे भयभीत झालेली मुलगी गेल्या तीन वषार्ंपासून नराधम सावत्र बापाचा अत्याचार सहन करीत होती. मात्र वारंवार होणार्या अत्याचाराचा त्रास असाह्य होत असल्याने धाडस करून तिने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.