Thu, Jun 20, 2019 14:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपघातस्थळी जलसंपदामंत्री आले देवदूतासारखे धावून

अपघातस्थळी जलसंपदामंत्री आले देवदूतासारखे धावून

Published On: Jul 11 2018 11:45PM | Last Updated: Jul 11 2018 11:45PM
नवी मुंबई:प्रतिनिधी 
 नागपूरहून जळगावकडे येणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पुन्हा एकदा अपघातग्रस्तांसाठी देवदूताप्रमाणे धावून आल्याचा प्रत्यय आला असून नांदुरा आणि मलकापूरच्या दरम्यान टोमॅटो घेऊन जाणारी पिकअप व्हॅन आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास पलटी झाल्यामुळे महामार्ग क्रमांक ६ वर दोन्ही बाजूला ४ ते ५ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या . मात्र याच रस्त्यावरून जाणारे ना. गिरीश महाजन यांनी कुठलीही वेळ न दवडता आपल्या कृतिशील स्वभावानुसार त्यांनी तातडीने इतर लोकांच्या मदतीने पलटी झालेले वाहन बाजूला करण्यास मदत केली . 

यानंतर वाहतूक सुरळीत झाली . अपघातात जखमी झालेल्या वाहन चालकाला तातडीने रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था जलसंपदामंत्र्यानी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन नेहमी तत्परतेने घटना कुठलीही असो त्यासाठी स्वतः धावून जातात  हा त्यांचा स्वभाव असून त्याचा प्रत्यय अनेकांना आला.