Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गृहराज्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण  

गृहराज्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण 

Published On: Apr 19 2018 9:08PM | Last Updated: Apr 19 2018 9:08PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

आज सायंकाळी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील हे शासकीय दौऱ्यावर असताना देऊळगाव राजा चिकली रोड येथे अचानक एका गाडीचा अपघात झाला. यावेळी रस्त्यावर कोणीही थांबण्यास तयार नसताना परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ डॉ. रणजीत पाटील हे थांबून मदत करण्यास पुढे सरसावले. 

रणजीत पाटील यांनी अँम्ब्युलंस येण्यास किती वेळ आहे अशी विचारणा केली. त्यावेळी अँम्ब्युलंस येण्यास अर्ध्यातासाचा अवकाश असल्याचे कळाले. त्यानंतर रणजीत पाटील यांनी स्वतःच्या ताफ्यातील गाडी उपचारासाठी उपलब्ध करून दिली आणि अपघातग्रस्तांचे प्राण वाचले.  

अपघातातील जखमींना मदत करुन गृहराज्यमंत्र्यांनी रस्त्यावर अपघात झालेला पाहूनही त्याकडे कानाडोळा करुन पुढे जाणाऱ्या लोकांसाठी  एक आदर्शच ठेवला आहे.