Wed, Jul 17, 2019 20:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोल्हापूरच्या खंडपीठासाठी १०० कोटी : मुख्यमंत्री

कोल्हापूरच्या खंडपीठासाठी १०० कोटी : मुख्यमंत्री

Published On: Feb 14 2018 4:03PM | Last Updated: Feb 14 2018 4:08PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

स्वतंत्र खंडपीठ होण्यासाठी कोल्हापूरकरांनी दिलेल्या लढ्याला आज, यश येत असल्याचे दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी १०० कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. मुख्यमंत्र्यांच्या दलनात ही बैठक झाली. राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात ही शंभर कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. 

खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा देऊ, उच्च न्यायालयाला हवे असले तसे पत्र तातडीने देण्याची ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली. दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, जेष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्रांची बैठक झाली. त्यात खंडपीठ होण्याच्या दिशेने सकारात्मक चर्चा झाली. 

कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचे स्वतंत्र खंडपीठ व्हावे, यासाठी कोल्हापुरात लोक चळवळ उभारण्यात आली होती. केवळ बार असोसिएशनच नव्हे, तर सामान्य नागरिकांनी खंडपीठासाठी रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधले होते. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर बार असोसिएशनने साखळी उपोषण करून खंडपीठाची मागणी लावून धरली होती. या संपूर्ण लढ्याला आज, यश येत असून, हायकोर्टाचे स्वतंत्र खंडपीठ दृष्टीपथात येऊ लागले आहे.