Sat, Jul 20, 2019 10:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ..तर राज्य सरकार स्वत: शेतकऱ्यांना मदत करेल : महसूलमंत्री

..तर राज्य सरकार स्वत: शेतकऱ्यांना मदत करेल : महसूलमंत्री

Published On: Dec 06 2017 8:55AM | Last Updated: Dec 06 2017 8:56AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

केंद्राने जर मदत दिली नाही, तर राज्य सरकार स्वत: मदत करेल; पण शेतकर्‍यांना दिलासा देण्यात येईल. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कर्जमाफीचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यांत जमा होण्यास आता अधिक वेळ लागणार नाही. आतापर्यंत 9 लाख 43 हजार शेतकर्‍यांच्या खात्यांत 5 हजार 141 कोटी रुपये जमा करण्यात आले असून, 17 लाख 68 हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीपोटी बँकांना 10 हजार 632 कोटी रुपये देण्यात आले आहेत. ते तत्काळ शेतकर्‍यांच्या खात्यांत जमा होतील. शिल्लक पैसेही येत्या दहा दिवसांत खात्यांवर जमा केले जातील. 40 लाख शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, तर सुमारे 40 लाख शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. त्यामुळे विरोधकांनी आणि सिन्हांनी आंदोलन करण्याची आवश्यकता नसल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.

यशवंत सिन्हांच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी