Sat, Jan 19, 2019 02:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवशाही-एसटी बसचा अपघात, ४० प्रवाशी जखमी 

शिवशाही-एसटी बसचा अपघात, ४० प्रवाशी जखमी 

Published On: Jun 28 2018 11:36AM | Last Updated: Jun 28 2018 1:08PMअलिबाग (जि. रायगड) : प्रतिनिधी

अलिबाग जवळील कार्लेखिंड घाटात शिवशाही बस आणि एसटी बसमध्ये समोरा समोर धडक झाली. शिवशाही बस एका मिनीडोर रिक्षाला ओव्हरटेक करुन येताना समारुन येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात ४० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना अलिबागच्या सरकारी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्‍याने अलिबाग कडे जाणाऱ्या सर्व गाड्या चोंडी मार्गे वळविण्यात आल्या आहेत. 

मुरुड-स्वारगेट या शिवशाही (क्र.MH04-GD8739) बसने समोरून येणाऱ्या एसटी बसला ( क्र.MH14-BL-1877) जोराची धडक दिली. या अपघातात बस चालक के. एस. लहाणे (बिल्ला क्र- 20476,अलिबाग आगार), वाहक एस. डी. येळे (बिल्ला क्र - 14876, अलिबाग आगार), शिवशाही चालक एस. एन. सय्यद, वाहक  ऐ. एच. क्षिरसागर ( 21670 मुरुड आगार) यांच्यासह  ४० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. 

अलिबाग पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.