Mon, Nov 19, 2018 12:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्करोगाशी झुंज देणारी सृष्टी मुंबई विद्यापीठात पहिली

कर्करोगाशी झुंज देणारी सृष्टी मुंबई विद्यापीठात पहिली

Published On: Jul 12 2018 10:46PM | Last Updated: Jul 12 2018 10:46PMपनवेल : प्रतिनिधी 

अपयशाने खचून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे उघडणारी कामगिरी पनवेलच्या सृष्टी कुलकर्णीने केलीय. रक्ताच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या सृष्टीने बीएस्सी केमिस्ट्रीच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात पहिली येण्याचा मान पटकावलाय. सृष्टीने परीक्षेत ९५.८७% मार्क्स मिळवलेत.

सृष्टी ही पनवेल मधील सिकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती गेल्या वर्षाभरापासून रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देतेय. तिच्यावर सध्या केमो थेरपी सुरू आहे. मात्र आपल्या आजारपणामुळे जराही न डगमगता तिने परीक्षेत हे उज्वल यश संपादन केले. या बरोबरच ती एक उत्तम लेखिका सुद्धा आहे नुकतंच तिच्या कॅलिडोस्कोप नावाचा पुस्तक प्रकाशित झाले आहे. यामुळे सृष्टीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.