Sat, Mar 23, 2019 18:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंध चाहता श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी व्याकूळ 

अंध चाहता श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी व्याकूळ 

Published On: Feb 28 2018 9:07AM | Last Updated: Feb 28 2018 9:16AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी यांचे शनिवारी मध्यरात्री दुबईत निधन झाले. त्‍यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडसह त्‍यांच्या चाहत्‍यांना मोठा धक्‍का बसला. मृत्‍यूचे वृत्‍त समजल्‍यापासून श्रीदेवी यांचे अतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईतील निवास्‍थानाबाहेर चाहत्‍यांनी मोठी गर्दी केली आहे. परंतु, या चाहत्‍यांमध्ये असाही एक चाहता आहे जो गेल्‍या दोन दिवसांपासून श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी त्‍यांच्या निवास्‍थानाबाहेर बसून आहे. 

संबंधित वातम्‍या : श्रीदेवींच्या मृत्यूची केस बंद; बोनी कपूरना क्लिन चीट

                       हवाहवाईच्या जाण्याने चाहत्यांना सदमा

                       : श्रीदेवींच्या मृत्यूचा नवा खुलासा; हार्टअटॅक नव्हे..

दुबईतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागल्‍याने श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास वेळ लागला. मात्र, या वेळेचा कोणताही विचार न करता उत्‍तर प्रदेशमधील जतिन वाल्मीकी नावाचा तरूण श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्‍यांच्या निवास्‍थानाबाहेर दोन दिवसांपासून त्‍यांच्या पार्थिवाची वाट पाहत आहे. जतिन अंध असून श्रीदेवी यांना त्‍याने कधीही पाहिले नाही पण श्रीदेवी यांनी त्‍याला केलेली मदत लक्षात ठेवून तो त्‍यांच्या दर्शनासाठी आला आहे. श्रीदेवी माझ्यासाठी खऱ्या आयुष्‍यातील देवी आहेत असे जतिन सांगतो. 

तो म्‍हणतो, ‘‘श्रीदेवी यांनी माझ्या भावाच्या ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशनसाठी मदत केली होती. त्‍यावेळी त्‍यांनी एक लाख रूपये दिले हाते आणि रूग्‍णालयाने एक लाख रूपयांचे बील माफ केले होते. त्‍यांच्यामुळेच माझा भाऊ आज जिवंत आहे. मी त्‍यांच्यासाठी काहीच करू शकत नाही मात्र, त्‍यांच्या अंतिम यात्रेत तरी सहभागी होऊ शकेतो.’’

‘‘श्रीदेवी या सर्वांसाठी एक कलाकार आहेत पण माझ्यासाठी त्‍या देवी आहेत. त्‍यांना मी कधीही विसरणार नाही. त्‍यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे.’’ अशा भावना जजिनने व्यक्‍त केल्‍या.