Fri, Nov 16, 2018 06:52



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीदेवी यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती : काकांचा दावा

श्रीदेवी यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती : काकांचा दावा

Published On: Mar 11 2018 8:05PM | Last Updated: Mar 11 2018 8:05PM



मुंबई : वृत्तसंस्था

बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचे काका वेणुगोपाल रेड्डी यांनी एक धक्‍कादायक माहिती दिली असून, श्रीदेवी ही मागील काही महिन्यांपासून प्रचंड दु:खी होती आणि तिची आर्थिक स्थिती योग्य नव्हती, असे म्हटले आहे.

रेड्डी यांनी एका तेलगु न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. श्रीदेवींच्या आयुष्यात खूप दुःख होते. त्या फक्‍त मुलींसाठी चेहर्‍यावर हास्य दाखवत होत्या. पती बोनी कपूर यांचे सिनेमे पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी श्रीदेवींच्या अनेक मालमत्ता विकल्या होत्या. त्यामुळे श्रीदेवीची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्या खूप अस्वस्थही होत्या, असे रेड्डी यांनी सांगितले.

श्रीदेवी यांनी पुन्हा सिनेमात काम करावे, असे बोनी कपूर यांनी तिला सांगितले होते. कुटुंबाचा सांभाळ आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, तिने बॉलीवूडमध्ये पुन्हा काम सुरू केले होते, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.

बॉलवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारीला दुबईत निधन झाले होते. चेन्‍नईमधील क्राऊन प्लाझामध्ये श्रीदेवींसाठी रविवारी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रार्थना सभेला बॉलीवूडसह तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते.