Sun, May 26, 2019 19:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...आणि आईची इच्छा अपूर्णच राहिली

...आणि आईची इच्छा अपूर्णच राहिली

Published On: Feb 25 2018 9:19AM | Last Updated: Feb 25 2018 9:19AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने  बॉलीवूडसह सर्वच स्‍थरातून शोक व्यक्‍त केला जात आहे. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी त्‍यांच्या चाहत्यांसह अनेकांना चटका देवून जाणारी आहे. पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह त्‍या दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्‍यातच त्‍यांचे निधन झाले. 

श्रीदेवीयांची मुलगी जान्हवी कपूर 'धडक' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच धडक या सिनेमातील पोस्टर लाँच झाले होते. श्रीदेवी यांनी ‘धडक’चे पोस्टर आपल्‍या ट्विटरवर पिंक करून ठेवले होते. यावरूनच त्‍यांना आपल्‍या मुलीच्या बॉलीवूड पदर्पणाबाबत किती उत्‍सुकता होती याची कल्‍पना येते. 

आपल्या मुलीची मोठ्या पडद्यावरील एंट्री पाहणं श्रीदेवी यांच्या नशिबातचं नव्हते. जान्हवीचे मोठ्या पडद्यावरील पदार्पण पाहण्याआधीच त्‍यांची मोठ्या पडद्यावरुन एक्झिट झाली.  त्‍यांच्या या अचानक एक्‍झिटने संपूर्ण बॉलीवूडसह चाहत्‍यांमधूनही शोक व्यक्‍त केला जात आहे.