Sun, Jul 21, 2019 02:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारतीयाने शोधला प्रकाशाच्या वेगाला मागे टाकणारा इलेक्ट्रॉन

भारतीयाने शोधला प्रकाशाच्या वेगाला मागे टाकणारा इलेक्ट्रॉन

Published On: Mar 01 2018 10:11AM | Last Updated: Mar 01 2018 10:11AMमुंबई : प्रतिनिधी

जगात सर्वात वेगवान कोण तर प्रकाशाचा किरण, असे मानले जाते. मात्र, मुंबईतील टाटा मूलभूत विज्ञान संस्थेतील प्रा. जी. रवींद्रकुमार यांच्या टीमने प्रकाशाच्या वेगाला काचेत चकवा देत त्यापेक्षा जलद जाणार्‍या इलेक्ट्रॉनचा शोध लावून ही थिअरी मोडित काढली आहे. शास्त्रज्ञांनी या इलेक्ट्रॉनच्या पूर्ण जीवनकाळाविषयीची माहितीही नोंदविण्यात यश मिळवले आहे.

प्रा. जी. रवींद्रकुमार यांच्या टीमच्या या संशोधनामुळे भविष्यात इलेक्ट्रोन इमेजिंग आणि वैद्यकशास्त्रात मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. यामध्ये प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावरणार्‍या इलेक्ट्रॉनमधून चेरेनकोव लहरींची निर्मिती होणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी काचेचा वापर करून प्रकाशाचा वेग नियंत्रित करण्यावर यश मिळवून त्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावणारे चेरेनकोव लहारी तेथून पार केल्या. तसेच या लहरींच्या उगमापासून त्यांचा अस्तापर्यंताच्या सर्व नोंदणीही केल्या. याचमुळे या संशोधनात नावीन्य आले आहे. त्यांचा हा प्रबंध नुकताच ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर्स’ या नामांकित नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

यानंतर जगभरातून या प्रयोगाबद्दल उत्सुकता व्यक्त होत आहे. लेझर तंत्रज्ञानात संशाोधन करण्यासाठी प्रा. जी. रवींद्रकुमार आणि डॉ. अमित लाड यांनी त्यांच्या प्रयोगशाळेतलेझर किरणे वाहून नेणारी मोठी यंत्रणा उभी केली आहे.टेराहर्टझ किरणांचा मानवी शरीरावर कोणताही अपाय होत नसल्यामुळे या किरणांना क्ष-किरणांपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. टेराहर्टझ विषयीचे प्रबंध यापूर्वीच ‘नेचर’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

काय फायदा होणार?
शस्त्रक्रियेसाठी सध्या वापरल्या जाणार्‍या लेझर तंत्रज्ञानापेक्षा अधिक अद्ययावत तंत्रज्ञान वापरून शरीरातील उतींवर उपचार करणे शक्य होईल. लेझर तंत्रज्ञानामुळे होणारे साइड इफेक्ट्सही कमी होतील. या संशोधनावर अधिक काम केल्यास भविष्यात या  किरणांच्या सहाय्याने बंद पुस्तकाचे वाचन करता येणे शक्य तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही या किरणांचा मोठा वापर शक्य.