Sun, Mar 24, 2019 22:57
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉगः खाकी वर्दीतील क्रौर्य आणि पोलिस तपास

ब्लॉगः खाकी वर्दीतील क्रौर्य आणि पोलिस तपास

Published On: Mar 04 2018 10:25AM | Last Updated: Mar 04 2018 10:25AMपनवेलमधील काम करणार्‍या सहय्यक पोलीस निरिक्षक आश्‍विनी बिंद्रे - गोरे या पोलीस दलातील महिला अधिकार्‍यांची झालेली निघुर्ण हत्या उघड झाल्याने सांगली नंतर ठाणे पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या कौर्याची सर्वाना प्रचिती आली. 2016 ला आश्‍विनीचे अपहरण करून ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेले अभय कुरंदकर या वरिष्ठ पोलीस निरिक्षकानेच हे कृत्य केले असून आपल्या तीन सहकार्यांच्या मदतीने हत्या करून पुरावे नष्ट करणार्‍यासाठी मृतदेहाचे तुकडे करून भाईंदर खाडीत फेकण्यात आले. या सर्व कृत्यांची व्याप्ती पाहिली तर पोलिसांमध्ये अमानूष चेहरा पुन्हा एकदा आधोरिखेत झाला. या प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक युक्त्या वारण्यात आल्याने पुरावे शोधण्याचे आव्हान पोलीसांसमोर असणार आहे. एका सह आरोपीच्या कबुली जबाबामुळे या हत्या प्रकरणावर प्रकाश पडला आणि कायद्याच्या रक्षकांकडूनच घडलेल्या या कृत्यामुळे पोलीस दलाला डोळयात अंजन घालण्याची वेळ आली आहे.

शशी सांवतः पुढारी ऑनलाईन

मुंबई आणि ठाणे पोलीसांची ख्याती गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी आहे. परंतु ठाणे पोलीस दलातील एका अधिकार्‍यांने आपल्याच खात्यातील महिला अधिकार्‍याची हत्या करून गुन्हेगारीचा विद्रृप चेहरा पुढे आणला. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या कृत्यामुळे पोलीस दलालाच मान खाली घालावी लागली आहे. एका महिला पोलिस अधिकार्‍याचे दोन वर्षापुर्वी बेपत्‍ता होणे आणि त्यानंतर तब्बल आडीच वर्षानी त्याचा तपास लागणे हा सारा घटनाक्रम मुंबई पोलिसांच्या कर्तव्य कठोर भुमिकेला छेद देणारे आहे.

पनवेलमधील अश्‍विनी बिंद्रे-गोरे या सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेल्या महिला पोलिस अधिकार्‍याचा खाकी वर्दातीलच वरीष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने तीन सहकार्‍यांच्यांची मदत घेऊन खुन करुन निर्दयीपणे तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन भाईंदरच्या खाडीत फेकुन दिल्याचे धक्कादायक आणि तेवढेच कृरता दाखविणारे कृत्य उघड झाल्याने खाकी वर्दीतील क्रृरता पुन्हा एकदा पुढे आली आहे. आणि त्याच बरोबर पोलिस खात्यातील महिला अधिकार्‍यांच्या सुरक्षीततेचा प्रश्‍नही अधिक गडदपणे समोर आला आहे.

ठाणे पोलिस दलात अश्‍विनी बिंद्रे आणि अभय कुरंदकर हे दोन्ही पोलिस अधिकारी एकत्र काम करीत असताना त्यांच्यात जुळलेला स्नेह आणि त्यातून पुढचे घडलेले हे प्रकरण पोलीसांच्या समाज रक्षकाच्या भूमिकेला छेद देणारे ठरले आहे. सद्रक्षणांय्... खलनिग्रणाय्... या उक्‍तीने वागणार्‍या पोलिसदलाला या कृत्यांने धक्‍का बसला आहे. मात्र प्रत्येक क्षेत्रातच वृत्‍ती आणि प्रवृत्‍ती या असतातच आणि अशातूनच दृष्कृत्यांचा जन्म होतो. या घटनेतील अनुभवही अशाच स्वरूपाचा आहे.

नवी मुंबई पोलिसांकडेच अश्‍विनी बिंद्रे बेपत्ताप्रकरणाचा तपास सुरु होता. गेले दिड वर्ष अश्‍विनी बेपत्ता आहे. या प्रकरणाचा छडा दिड वर्षात लागलेला नव्हता, त्याला एकमेव कारण होते, ते म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हे पोलिस अधिकारी होते हेच. या प्रकरणाचा प्रथम तपास सहा महीन्यांपूर्वी पनवेलचे एसीपी प्रकाश निलेवाड यांच्याकडे देण्यात आला होता. यानंतर काही प्रमाणात गतीही मिळाली परंतु निर्णायक स्वरूपात तपास आला नव्हता. यानंतर आश्‍विनीचे पती आणि नातेवाईक यांनी याप्रकरणाचा तपास महीला पोलिस अधिकारी संगिता शिंदे-अल्फान्सो यांच्याकडे देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर आल्फान्सो या केसमध्ये सक्रिय झाल्या. तत्पूर्वी त्या पोलीस निरिक्षक म्हणून तपास पथकामध्ये होत्या. मात्र दरम्यानच्या कालावधीत त्यांची सहय्यक पोलीस पदावर बढतीने बदली झाल्याने हा तपास त्यांच्यापासून दूर गेला होता. पुन्हा सुत्रे हाती येताच त्यांनी या प्रकरणाचा तपास तडीस नेला.

एका महीलेच्या निर्दयी हत्येचा तपास एका कर्तबगार महीला अधिकार्‍यांनी हाती आल्यानेच एका हत्या झालेल्या महिलेला न्याय मिळाला आहे. सुरुवातीला एसीपी निलेवाड यांनी अभय कुरुंदकर आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील यांना अटक केली होती. मात्र प्रकरणाचा तपास पुढे सरकला नव्हता. त्यानंतर चालक कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर अश्‍विनीचे अपहरण करुन हत्या केल्याचे तपासात उघड झाले. विशेषतः महेश फळणीकर या अभय कुरुंदकर याच्या बालमित्रांने दिलेला कबुली जबाब महत्वाचा ठरला आहे. अश्‍विनी बेपत्‍ता झाल्यानंतर कुरूंदकर यांचे कॉल नेहमीच फळणीकर यांना झाले होते. हिच गोष्ट तपासासाठी महत्वाची ठरली.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह मदत करणार्‍या तिघांवर अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करणे अशा कृत्यांखाली गुन्हयाची नोंद झाली आहे. 11 एप्रील 2016 ला अश्‍विनी बिंद्रे अचानक बेपत्ता झाल्याची तारीख आहे. यानंतरच तिची हत्याही झाली आहे. ही हत्या कुरूंदकर यांच्या घरातच झाल्याची कबुली सहआरोपींनी आता दिली आहे. मात्र जवळपास 16 महीन्यांनी म्हणजेच 7 डिसेंबर 2017 रोजी हत्या करणारा अभय कुरंदकर अटकेत गेला. परंतू तपासाची संपुर्ण सुत्रे फिरण्यास 2018 साल उजाडले याचे कारण या गुन्हात पुरावे नष्ट करण्यासाठी झालेले प्रयत्न हेही आहे.

अश्‍विनीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते भाईंदरच्या खाडीत फेकून दिल्याची कबुळी महेश फळणीकर यांने दिल्यावर या अमानुष कृत्याची कल्पना सर्वांच आली. असा प्रकार कायद्याच्या रक्षकानेच केल्याने कुंपणानेच शेत खाल्याचे स्पष्ट झाले. आपल्याच खात्यातील अधिकार्‍याची हत्या करुन पोलिस दलालाच काळीमा फासणार्‍या या अधिकार्‍याच्या विरोधात आता पोलीस दलालाचा अधिक कठोर भुमिका घ्यावी लागणारा आहे. अशा अधिकार्‍याविरुध्द कठोर कारवाई करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचे आव्हान आता पोलिस पथकासमोर असणार आहे. कुरुंदकर यांच्या भाईंदर येथील घरामध्ये अश्‍विनीची हत्या करुन लाकुड कापण्याच्या कटरने मृतदेहाचे तुकडे करुन ते एका पेटीत भरून ती दुसर्‍या दिवशी खाडीत फेकण्यात आली. असा कबुली जबाब आहे. खरतरं हत्या झाल्यानंतर लगेचच मृतदेह फेकण्याचे आदेश कुरूंदकरने राजेश पाटील याला दिले होते. मात्र त्याने असमर्थता दर्शवल्यानंतर दुसर्‍या दिवशी मृतदेह फेकण्यात आला. असेही तपासात पुढे आले आहे. मात्र कुरुंदकरने अद्यापही कबुली जबाब दिला नसल्याने पोलीसांना तिथपर्यंत पोचण्यासाठी आता प्रयत्न करावे लागणार आहेत.

या सर्व गुन्हाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर असलेल्या संगिता शिंदे - अल्फान्सो या महिला पोलिस अधिकार्‍यांच्या हाती देण्यात आला आहे. या घटनेचा तपास मोठ्या हिंमतेने त्यांनी पुढे नेला आहे. आणि त्यातूनच कुरंदकर याचा क्रुर चेहराही समोर आला आहे. मात्र कायद्याच्या लढाईत पुरावे महत्वाचे असल्याने पुढील तपासात आता अधिक कस लागणार आहे. मात्र याही कामात पोलीस आता कठोर भुमिका घेतील हे नक्‍की!