Sun, Aug 25, 2019 01:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चार आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले

चार आमदारांचे राजीनामे स्वीकारले

Published On: May 16 2019 12:08PM | Last Updated: May 16 2019 3:28PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

विविध कारणास्तव राजीनामा दिलेल्या चार आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केले. यामध्ये धुळ्याचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, आणि हर्षवर्धन जाधव यांचा समावेश आहे. 

या चारही आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. धुळे महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी केलेल्या आमदार अनिल गोटे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले होते. 

वरोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुरेश बाळू धानोरकर यांनी भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे सांगत राजीनामा दिला होता. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिल्याने चिखलीकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.