Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : लोकलमध्ये साप, प्रवाशांची धावपळ (Video)

लोकलमध्ये साप, प्रवाशांची धावपळ (Video)

Published On: Aug 02 2018 2:18PM | Last Updated: Aug 02 2018 2:18PMठाणे : अमोल कदम

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल म्हटली की प्रवाशांना आठवते ते नियमित उशिरा धावणाऱ्या लोकल, पण गुरुवारी सकाळी अजबच घडले टिटवाळा वरून निघालेल्या मुंबई सिएसमटी दरम्यान सकाळची 8 वाजून 33 मिनिटांच्या लोकलमध्ये हरणटोळ हा हिरव्या रंगाचा साप द्वितीय दर्जाच्या डब्यामधील पंख्यावर लटकलेला आढळला.

 लोकल ठाणे स्थानक दरम्यान आली असता प्रवाशांना डब्यामधील पंख्यावर साप दिसला. त्यामुळे प्रवशानी लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला पण काही प्रवाशानी सापाला कंबरेच्या पट्ट्याने झोडत पंख्यावरून खाली पाडले आणि नंतर डब्यातून त्याला बाहेर काढण्यात आले. तब्बल अर्धा तास साप लोकलच्या डब्यामध्ये होता. कदाचित एखाद्या प्रवाशाला साप चावला असता तर त्या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असता. त्यामुळे लोकल ज्या ठिकाणी उभ्या केल्या जातात त्याची तपासणी देखील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केली पाहिजे अशी मागणी प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे.