Fri, Jan 18, 2019 21:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आम्हाला हक्काची घरे द्या’; झोपडपट्टी रहिवाश्यांचा पालिकेवर मोर्चा

आम्हाला हक्काची घरे द्या’; झोपडपट्टी रहिवाश्यांचा पालिकेवर मोर्चा

Published On: May 21 2018 2:43PM | Last Updated: May 21 2018 2:41PMकल्याण : प्रतिनिधी

कल्याण पश्चिमेकडील इंदिरा नगर झोपडपट्टीतील राहिवाश्यांना बीएसयूपी प्रकल्पात समाविष्ठ केल्याने या प्रकल्पामध्ये ३३० कुटुंब विस्थापित झाले होती. पण, या कुटुंबांच्या पुर्नवसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याने प्रहार संघटना सत्याग्रह फोरमच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा नगर झोपडपट्टीतील राहिवाश्यांनी आज पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला.

इंदिरा नगर झोपडपट्टीतील राहिवाश्यांना विस्थापिताना प्रकल्पात घरे देणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र या बाधितांमधील  १८३ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली तेरा वर्ष धूळखात ठेवल्याने संतापलेल्या बाधीतांनी सोमवारी दुपारी साडे बारच्या सुमारास प्रहार संघटना सत्याग्रह फोरम असमर्थ नागरिक सेवाभावी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढला.  इंदिरा नगर गोविंदवाडीमार्गे-एपीएमसी मार्केट पासून शेकडो महिलांचा धडक मोर्चा केडीएमसी मुख्यालयावर धडकला. या मोर्च्यात बाधित राहिवाश्यांनी आम्हाला आमची हक्काची घरे द्या, असा नारा देत संताप व्यक्त केला.