Sat, Nov 17, 2018 09:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रियकराची हत्‍या करून प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्याचे स्केच जारी  

प्रियकराची हत्‍या करून प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्याचे स्केच जारी  

Published On: Mar 07 2018 8:53PM | Last Updated: Mar 07 2018 8:53PMटिटवाळा : प्रतिनिधी

प्रेयसीसोबत बोलत बसलेल्या युवकाला लुटण्यासाठी आलेल्या एका लुटारूने त्‍याच्यावर गोळ्या झाडून हत्‍या करून प्रेयसीवर  बलात्कार करणाऱ्या आरोपीचे स्‍केच जारी करण्यात आले आहे. कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ जवळील चिंचपाडा-नालंबी या  गावालतगच्या रस्त्यावरील टेकडीवर ५ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली होती.

पीडित युवतीने दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे स्केच प्रसिद्ध करण्यात आले आहे. स्केचमध्ये वर्णन केल्याप्रमाणे आरोपीचे अंदाजे  वय ३५ असून, त्याची उंची साधारणता ५.१० अशी आहे. याबाबत नागिरकांना काही  माहिती असल्यास पोलिसांशी  संपर्क करावा त्यांची माहिती गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.  

दरम्यान, पोलिसांची पथके या आरोपीचा कसून शोध घेत असून, लवकरात लवकर तो जेरबंद केला जाईल आमचे तसे प्रयत्न चालू आहेत असे टिटवाळा पोलिस स्टेशचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले.