Sun, Aug 25, 2019 19:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत सहा गोदामे जळून खाक 

भिवंडीत सहा गोदामे जळून खाक 

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 30 2018 1:23AMभिवंडी : वार्ताहर

तालुक्याच्या गोदाम पट्ट्यातील राहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वागत कंपाऊंडमध्ये असलेल्या श्री हर्ष कॅरिअर ट्रान्सपोर्ट या गोदामाला रविवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत कापड साठा असलेली सहा गोदामे जळून लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाले आहे. 

कापड गोदामाला पहाटे अचानक भीषण आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने सहाही गोदामे जळून खाक झाली. ही आग भिवंडी, ठाणे, कल्याण अग्निशमन दलांनी 10 तासांत आटोक्यात आणली.  

राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील न्यु स्वागत कम्पाऊंड या गोदाम संकुलातील श्री हर्ष कॅरिअर या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामास प्रथम भीषण आग लागली. यात 3 गोदामात मोठ्या प्रमाणात तयार कपड्याच्या ताग्यांचे बंडल होते. शिवाय  गोदामात पाच कामगार झोपले होते. गोदामाच्या आतील बाजूतून धूर येऊ लागल्याने एका कामगारास जाग आली. त्याने प्रसंगावधान राखीत सर्व कामगारांना झोपेतून उठवीत गोदामाबाहेर पलायन केले.